इसिसचा म्होरक्या बगदादी ठार: ट्रम्प यांनी केले ट्विट


वेब टीम : न्यूयॉर्क
दहशतवादी संघटना आयएसआयएसआयचा प्रमुख अबू बक्र अल-बगदादी याला अमेरिकेच्या लष्कराने उडवले, माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

अमेरिकेच्या लष्कराने त्याच्याविरुद्ध मोहींम उघडली होती. काही वेळापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी “काहीतरी खूप मोठं घडले आहे” असे ट्विट केले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटसोबत अमेरिकेच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याचा हवाल्याने सीएनएन वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले होते की – अमेरिकेच्या सैन्य दलाने शनिवारी वायव्य सिरियात केलेल्या हल्ल्यात बगदादीला उडवले.

ट्रम्प यांनी म्हटले आहे की, “कालच्या रात्री अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या एका मोठ्या कारवाईत आयसिसचा म्होरक्या अबु बक्र-अल बगदादी ठार झाला आहे.

त्याच्यासोबत त्याची तीन मुलं आणि अनेक सहकारी देखील मारले गेले. बगदादी एका खंदकात लपून बसला होता.

अमेरिकेच्या सैन्याने त्याला घेरल्यानंतर त्याने स्वतःसह आपल्या मुलांना भूसुरुंगाच्या सहाय्याने उडवून दिले, तो भेकड होता.”

या संदर्भात उल्लेखनीय आहे की जगात इस्लामचे राज्य स्थापित करण्यासाठी बगदादीने जगभरातील अनेक देशात आयएसआयएसआयच्या माध्यमातून दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न केला.

काही ठिकाणी त्याला यात यशही मिळाले.
बगदादी गेल्या पाच वर्षांपासून लपून बसला होता. या दरम्यान बरेचवेळा तो ठार झाल्याचे वृत्त आले आहे.

दोन वर्षांपूर्वी रशियाच्या सैन्याने बगदादीचा खात्मा केल्याचा दावा केला होता. मात्र नंतर तो खोटा ठरला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post