अरे बापरे! : बांगलादेशचे क्रिकेटपटू गेले संपावर


वेब टीम : ढाका
बांगलादेश क्रिकेट संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येत आहे. मात्र,हा दौरा अनिश्चित राहण्याची शक्यता निर्माण होत आहे. बांगलादेशच्या क्रिकेट संघाने आजपासून (सोमवार) संप पुकारला.

जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत,तोपर्यंत कोणत्याही स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

संघातील खेळाडूंनी बांगलादेशी क्रिकेट मंडळाकडे अकरा मागण्या केल्या आहेत. त्यात मानधन वाढवावे ही प्रमुख मागणी आहे.

बांगलादेशचा संघ ३ नोव्हेंबरपासून भारत दौऱ्यावर येणार आहे. मात्र, बांगलादेश संघातील खेळाडूंनी संप पुकारला.

आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत यापुढील कोणत्याही स्पर्धेत भाग घेणार नाही, असे खेळाडूंनी सांगितले.

मानधनात वाढ करावी या प्रमुख मागणीसह एकूण अकरा मागण्या त्यांनी बांगलादेश क्रिकेट मंडळासमोर ठेवल्या.

 त्यामुळं आगामी नॅशनल क्रिकेट लीग आणि भारत दौरा अनिश्चित आल्याची चर्चा आहे.

संघातील वरिष्ठ खेळाडू शाकिब अल हसन, महमुदुल्ला, मुशफिकर रहिम आदींनी पत्रकार परिषद घेऊन संपावर जाण्याची घोषणा केली.

प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनीही मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवला. क्रिकेटचे व्यवस्थापन ज्या पद्धतीने केले जात आहे, त्यावर खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post