बेछूट गोळीबारात भाजपाच्या नगरसेवकासह पाच ठार


वेब टीम : भुसावळ
पूर्ववैमनस्यातून करण्यात आलेल्या हल्ल्याने रविवारी रात्री भुसावळ शहर हादरले. भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्यावर तीन जणांनी अंदाधुंद गोळीबार केला.

यात रवींद्र खरात (५०) यांच्यासह त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात (५५) मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०), सुमित गजरे हे पाच जण ठार झाले आहेत.

तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपीही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे भुसावळ हादरले आहे.


भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात हे भुसावळमधील समता नगर येथे राहतात. रविवारी रात्री पावणे दहा वाजता चार हल्लेखोरांनी खरात यांच्या घराच्या अंगणात येऊन अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली.

त्यामुळे खरात यांच्या कुटुंबियांची एकच धावपळ उडाली. या गोळीबारात खरात यांचे बंधू सुनील खरात आणि त्यांचा मुलगा सागर हे जागीच ठार झाले.

तर स्वत: रवींद्र खरात आणि त्यांचा मुलगा रोहित खरात आणि सुमित गजरे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. या हल्ल्यात रवींद्र खरात यांची पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा हितेश आणि अजून एकजण असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

हल्ल्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर अचानक झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने भुसावळ शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post