नगरमध्ये अनिल राठोडांच्या अडचणी वाढल्या; १६ ब्राह्मण संघटना विरोधात


वेब टीम : अहमदनगर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेमध्ये राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, राष्ट्रवादीने शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांना मोठा धक्का दिला आहे.

शिवसेना-भाजप युतीचा पारंपारिक मतदार म्हणून ओळखला जाणारा ब्राह्मण महासंघ राठोड यांच्याविरोधात गेल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीच्या स्थानिक उमेदवाराने ब्राह्मण समाजासाठी केलेल्या कामाची पावती म्हणून सोळा संघटनांनी एकत्र येत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे अनिल राठोड यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

शनिवारी (दि.१२) सायंकाळी गुलमोहर रोडवरील हॉटेल सायंतारा येथे पार पडलेल्या बैठकीत ब्राह्मण महासंघाच्या 16 संघटनांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

सनातन धर्म सभा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ, अखिल भारतीय बहुभाषिय ब्राह्मण महासंघ, परशुराम सेवा संघ, परशुराम प्रतिष्ठान, ब्राह्मण सेवा संघ, ब्राह्मण सभा भिंगार, ब्राह्मण सभा केडगाव, ब्राह्मण बिझनेस नेटवर्क, ब्राह्मण सभा एमआयडीसी, समर्थ परिवार, अहमदनगर जिल्हा पुरोहित संघ, ब्राह्मण सभा आगरकर मळा आदी संघटनांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.

 अहमदनगर जिल्हा ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष किशोर जोशी सचिव मंदार मुळे उपाध्यक्ष ऋषिकेश कुलकर्णी आदींच्या पाठींब्याच्या पत्रावर सह्या आहेत.

शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला मानणारे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित असल्याचे समोर आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post