शिवसेनेमुळेच पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा पराभव : चंद्रकांत पाटील


वेब टीम : कोल्हापूर
आमच ठरलयं असे सांगत शिवसेनेचे खा.संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांना साथ दिली.

लोकसभा निवडणुकीत आ. पाटील यांनी केलेल्या मदतीचा पैरा फेडला.

पश्चिम महाराष्ट्रातील पराभावास खा. मंडलिक हेच जबादार असल्याचा खुलासा भाजपचे प्रदशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला.

लोकसभेप्रमाणे भाजपला पश्चिम महाराष्ट्रात यश का मिळाले नाही? हा आमच्यासाठी चिंतेचा विषय असून भाजपकडून अपयशाचे चिंतन सुरू आहे.

पाटील म्हणाले, खा. मंडलिक यांनी महायुतीचा धर्म न पाळत काँग्रेस राष्ट्रवादी अघाडीची साथ दिली. त्यामुळे महायुतीचा पश्चिम महाराष्ट्रात दारुण पराभव झाला.

शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे पहिल्या दिवसापासून सतेज पाटील यांच्या सोबत काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात होते. सतेज पाटील यांनी खासदारकीला मला मदत करत मोठे लिड दिले असे सांगून पैरा फेडण्याचे काम मी करत असल्याचे संजय मंडलिक म्हणत होते.

त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महयुतीचा जो काही पराभव झाला आहे तो मंडलिकांमुळे झाला आहे. मंडलीक यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात काम केले.

लोकसभेला मदत केलेल्यांची पैरा फेडण्यात एकमेकाला पाडले. त्यामुळे मंडलिक प्रवृत्तिला वेळीच शिवसेनेने ओळखावे, असा इशारा देत ज्यांनी युती धर्म पाळला नाही त्यांना नोटीसा मिळणार असल्याचा इशारा दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post