शुक्लकाष्ठ संपेना; मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर रूतले चिखलात


वेब टीम : पेण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे हेलिकॉप्टरचे काही तरी शुक्लकाष्ठ आहेच.

आज पुन्हा एकदा रायगड मध्ये त्यांच्या हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाड निर्माण झाला.

कारण पेण मध्ये उतरताना त्याच्या हेलिकॉप्टरचे चाक चिखलात रुतले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुखरूपपाने बाहेर आले. पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

या हेलिकॉप्टरमध्ये एक अभियंता, मुख्यमंत्रयांचे पीए, एक सहा वैमानिक असे पाच जण होते.

हे हेलिकॉप्टर हेलिगो चार्टर प्रा.ली. कंपनीचे होते. नगर जिल्ह्यातील कर्जत मधून सभा संपल्यावर रायगड येथील पेण मध्ये प्रचारासाठी येत आहेत.

पण पाऊस पडून गेल्याने हेलिपॅडच्या जागी माती आणि चिखल झाला होता. हेलिकॉप्टर ४.२५ वाजता उतरले.

पण चिखलामुळे एक चाक रुतले आणि पायलटने क्षणार्धात गेलेले नियंत्रण परत मिळवले आणि मुख्यमंत्री आणि इतर पाच जण सुखरूप बाहेर पडले.

या घटनेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले,”वस्तुत: कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. त्याच हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री उल्हासनगर येथे रवाना झाले आणि तेथील सभाही त्यांनी केली.

त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवेवर, चुकीच्या माहितीवर कुणीही विश्वास ठेऊ नये.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post