‘दंगल गर्ल’मुळे रंगतदार लढत


वेब टीम : हरियाणा
दंगल गर्ल’ पैलवान बबीता फोगाट निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. त्यामुळे दादरी विधानसभा मतदारसंघात रंगतदार लढत पहायला मिळत आहे.

या मतदारसंघात मागच्या दोन दशकांत कोणताच पक्ष सलग दुसर्‍यांदा विजय मिळवू शकला नाही. भाजप उमेदवार बबीता या जननायक जगता पक्षाचे (जेजेपी) सतपाल सांगवान आणि काँग्रेस उमेदवार नृपेंद्र सिंह यांसारख्या दिग्गज नेत्यांविरुद्ध निवडणूक लढत आहे.

हे दोन्ही उमेदवार याआधी दादरी मतदारसंघातून दोन हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. बबीता फोगाट ‘दंगल’ चित्रपटानंतर देशभरातील घरा-घरात पोहोचल्या आहेत.

‘दंगल’ चित्रपट बबीता यांचे वडील आणि प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक महावीर फोगाट आणि त्यांची बहीण गीता यांच्या संघर्षावर आधारित आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेती बबीता फोगाट जेव्हा निवडणूक प्रचारात निघते त्यावेळी संपूर्ण गाव तिच्या स्वागतासाठी जमत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post