खासदार धैर्यशील माने आता शिवसेनेच्या प्रवक्तेपदी


वेब टीम : मुंबई
निकालादिवशी शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या प्रवक्त्यांच्या यादीत हातकणंगले मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांना स्थान देण्यात आले आहे.


पक्षाच्या मीडिया विभागाने १८ नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत असलेल्या नेत्यांनाच पक्षाची भूमिका मांडणे आणि पक्षाच्या मुद्यांवर प्रतिक्रिया देतील.


या यादीत असलेल्या नेत्यांमध्ये धैर्याशील माने, भावना गवळी, निलम गोऱ्हे, अरविंद सावंत, विशाखा राऊत, राहुल शेवाळे, अनिल परब, मनीषा कायंडे आणि सुनील शिंदे यांचा समावेश आहे.

या नेत्यांसोबतच सुरेश चव्हाण, सचिन अहिर, वरुण सरदेसाई, हेमराज शहा, साईनाथ दुर्ग, किशोर कान्हेरे, शितल म्हात्रे आणि शुभा राऊल हे पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम पाहतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post