वेब टीम : पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांनी पुण्यात सदनिका घेण्यासाठी घेतलेले सुमारे एक कोटी 43 ...
वेब टीम : पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांनी पुण्यात सदनिका घेण्यासाठी घेतलेले सुमारे एक कोटी 43 लाख रुपयांचे कर्ज थकवल्या प्रकरणी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने त्यांच्या पुण्यातील फ्लॅटवर जप्ती आणली आहे.
येत्या 15 दिवसांत याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात येणार असून, त्यानंतर तहसीलदार आणि पोलिस बंदोबस्तात या सदनिकेचा लिलाव केला जाणार आहे.
या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून सहकार विभागाने प्रशासक नेमला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने(आरबीआय) आर्थिक अनियमिततेमुळे या बँकेवर निर्बंध लावण्यात आले आहेत.
त्यामुळे खातेदारांना एक हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही. यानंतर थकबाकीदारांविरूद्ध कठोर कारवाई सुरू आहे. त्यामध्ये मुंडे यांच्यावर कारवाई झाली आहे.
मुंडे यांनी पुण्यात मॉडेल कॉलनी येथील युगाई ग्रीन सोसायटीमध्ये सदनिका खरेदी केली आहे. त्यासाठी बँकेकडून एक कोटी 43 लाखांचे कर्ज घेतले होते.
70 लाख सहा हजार 886 रुपये थकीत होते. हे कर्ज वेळेत न फेडल्यामुळे बँकेने त्यांना नोटीस पाठविली होती.
त्यानंतरही कर्जाचा हप्ता जमा न केल्यामुळे त्यांच्या सदनिकेचा ताबा घेण्यात आला आहे.
COMMENTS