भाजपला गोपीनाथ मुंडेंचा विसर पडला : धनंजय मुंडे


वेब टीम : बीड
आज मोदींच्या सभांसाठी छापलेल्या जाहिरातीत स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांचा साधा फोटोसुद्धा नव्हता.मोदींनी गोपीनाथ गडाकडेही पाठ फिरवली.

माझ्या जीवनातील हा सर्वात वाईट दिवस होता,” अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या केल्या.

पंतप्रधान यांनी बीड जिल्ह्यातून प्रचाराला सुरवात केली. मात्र त्यानंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला गोपीनाथ मुंडेंचा विसर पडल्याची टीका केली.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना पक्षांतर्गत झालेला त्रास सर्वश्रुत आहे. मात्र भाजपकडून मुंडेंची उपेक्षा मरणोपरांतही सुरूच असल्याचे दिसते.

आज परळीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपीनाथ गडावर जाणे टाळले.

 प्रदेश भाजपकडून राज्यभर महत्वाच्या सर्व दैनिकात दिलेल्या आजच्या परळी येथील सभेच्या जाहिरातींमध्येही गोपीनाथ मुंडेना स्थान नाही. त्यामुळे मुंडेंप्रेमी व वंजारी समाजात नाराजीचा सूर आहे.

मोदींच्या सभेची जिल्हा नव्हे तर राज्यभर गेल्या आठ दिवसांपासून जय्यत तयारी केल्याची चर्चा होती. मुंडे यांच्या निधनानंतरही त्यांच्या अंत्यदर्शनाला मोदी आले नव्हते.

त्यावेळीही मुंडे प्रेमींनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आता त्यांचे पुतणे आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी टीका केलेली दिसते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post