मुंडे साहेबांसोबत मी सावलीसारखा राहिलो, ताईला त्यांचे स्वप्न काय माहीत : धनंजय मुंडे


वेब टीम : बीड
ताईसाहेब मुंडे साहेबांचे नाव लावतात. मात्र ताईसाहेबांना मुंडे साहेबांचे स्वप्न काय आहे तेच माहिती नाही. मी मुंडे साहेबांच्या पोटी जन्माला आलो नाही पण मी साहेबांसोबत सावली सारखा वावरलो.

त्यांची लोकांसाठीची स्वप्ने मला माहिती आणि ते स्वप्न मी पूर्ण करणार , असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले आहे .

परळी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही लक्ष्यवेधी ठरणार आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहिण भावामध्येच थेट सामना रंगणार आहे.

या पार्श्वभूमीवर दोघेही एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडात आहेत. पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या सभेत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला .

परळीत राहणाऱ्या लोकांच्या मनात मला विजयी करण्यासाठी जितका उत्साह दिसतोय तितकाच उत्साह पुण्यात राहणाऱ्या परळीकरांमध्ये दिसतोय. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असेही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post