--> दुधी भोपळ्यात आहेत 'इतके' औषधी गुणधर्म | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

दुधी भोपळ्यात आहेत 'इतके' औषधी गुणधर्म

वेब टीम : दिल्ली दुधी भोपळ्यामध्ये दुधाइतकेच शरीरास आवश्यक असे पोषक घटक आहेत म्हणूनच त्याचे नाव दुधी भोपळा पडले आहे. लांबट बाटलीच्या आक...


वेब टीम : दिल्ली
दुधी भोपळ्यामध्ये दुधाइतकेच शरीरास आवश्यक असे पोषक घटक आहेत म्हणूनच त्याचे नाव दुधी भोपळा पडले आहे. लांबट बाटलीच्या आकाराची फिक्या हिरवट रंगाची, आतून पांढऱ्या स्पंजासारखी आणि लांब चौकोनी बियांनी युक्त ही फळभाजी सर्वांनाच आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

 संस्कृतमध्ये कर्कटी,इंग्रजीमध्ये बॉटल गार्ड, तर शास्त्रीय भाषेत कुकरबीटा मॅक्झिमा या नावाने ओळखला जाणारा दुधी भोपळाकुकर बिटेसी या कुळातील आहे.

दुधी भोपळा ही वेल प्रकारातील वनस्पती असून या वनस्पतीची फुले पांढरी असतात.

औषधी गुणधर्म

लोह, कॅल्शिअम, फॉस्फरसब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे,आर्द्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्येअसतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, हृदय,मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा वबलकारक आहे.

उपयोग

दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याकारणाने तो हृदय रोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे. हृदयविकारामध्ये रक्त वाहिन्यांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल साठून रक्तपुरवठा सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो. अशा वेळी रोज सकाळी अर्धा कप दुधी भोपळ्याचा रस, तुळशीची ७-८ पाने, पुदिन्याची ७-८ पाने, संधव, जिरे व काळीमिरी एकत्र करून रोज सकाळी हा रस प्यावा. यामुळे रक्तवाहिन्यांवरील अडथळा दूर होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.

दुधी भोपळा हा धातुपुष्टीकर असल्याकारणाने गर्भवती स्त्रीने आहारामध्ये दुधीचे सेवन नियमित करावे. यामुळे गर्भवतीचे आरोग्य चांगले राहून गभार्चे पोषणही व्यवस्थित होते. तसेच गर्भावस्थेमध्ये वारंवार होणारा मलावष्टांभाचा त्रासही दूर होतो.

उष्णतेमुळे शरीराची लाहीलाही होत असेल तर दुधीचा रस खडीसाखर घालून प्यावा. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो.

स्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी रोज संध्याकाळी जेवणापूर्वी दुधीचे सूप प्यावे. या सूपाला संधव, जिरे, हळद, मीठ व गाईच्या तुपाची फोडणी द्यावी. यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते व शरीरास सर्व पोषक घटक ही मिळतात.

अति उष्णता, जुलाब,आम्लपित्त, मधुमेह, अतितेलकट खाणे यामुळे जर वारंवार तहान लागत असेल, तर अशावेळी ग्लासभर दुधीचा रस चिमूटभर मीठ घालून घ्यावा. यामुळे घामातून शरीराबाहेर जाणारे क्षार कमी होतात.तहान लागणे कमी होते व थकवा जाणवत नाही.

शांत झोप येत नसेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याच्या रसाने तयार केलेले तेल डोक्याला व तळपायाला लावावे. हे तेल बनविताना दुधीभोपळ्यासोबत त्याची पाने व फुले ही घ्यावीत. या तेलामुळे थंडावा निर्माण होऊन शांत झोप लागते.

लघवीला जळजळ होत असेल तर अशा वेळी ग्लासभर दुधीरस त्यामध्ये अध्रे लिंबू पिळून घ्यावे.यामुळे मूत्रातील अतिरिक्त आम्लाचे प्रमाण कमी होते व साहजिकच शरीराची उष्णता कमी होऊन लघवीची जळजळ थांबते.

खूप ताप आला असेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याचे सूप पिणेहे एक उत्तम औषध ठरते. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते. तसेच ताप चढत असल्यास दुधी किसून कपाळावर लेप लावावा. असे केल्याने ताप उतरण्यास मदत होते.

पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पित्ताचा तसेच उष्णतेचा त्रास होत असेल तर नियमितपणे आहारातून दुधीचे सेवन करावे. यामुळे शरीराला शीतलता प्राप्त होते.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4279,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2652,Politics,2715,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: दुधी भोपळ्यात आहेत 'इतके' औषधी गुणधर्म
दुधी भोपळ्यात आहेत 'इतके' औषधी गुणधर्म
https://1.bp.blogspot.com/-gVIXTYepAtY/XZoyJDureGI/AAAAAAAAE9w/n_rgkn3aB80dE1hB5NHTxMwOE5VfQhSBQCLcBGAsYHQ/s320/23-55-47-Untitled-618.jpg
https://1.bp.blogspot.com/-gVIXTYepAtY/XZoyJDureGI/AAAAAAAAE9w/n_rgkn3aB80dE1hB5NHTxMwOE5VfQhSBQCLcBGAsYHQ/s72-c/23-55-47-Untitled-618.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2019/10/Dudhi-bhopala.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2019/10/Dudhi-bhopala.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content