यादीत नाही नाव, तरी खडसेंनी भरला विधानसभेचा फॉर्म


वेब टीम : जळगाव
भारतीय जनता पक्षाने आज आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

 १२५ उमेदवारांच्या यादीत एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे यांना स्थान नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

त्यातच भाजपने जळगाव मधील ७ पैकी ६ जागांवरचे उमेदवार जाहीर केले आहेत पण खडसेंच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील उमेदवार मात्र जाहीर केला नाही.

खडसेंनी मात्र मुक्ताईनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज भरुन झाल्यावर संवाद साधताना ‘पक्षाने जाहीर केलेल्या यादीत माझे नाव नसले तरी मला उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे मी अर्ज भरलेला आहे. जागावाटपात ही जागा सेनेला जाईल किंवा भाजपला हेही मला ठाऊक नाही. मी गेली ४२ वर्ष पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, हे मात्र मला पक्के ठाऊक आहे’ अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post