मला भाजपची उमेदवारी नाही, पक्षाचा निर्णय मान्य : खडसे


वेब टीम : जळगाव
पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचे स्वतः एकनाथ खडसे यांनी आज (०३ ऑक्टोबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.

 त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक खडसे लढणार नाहीत, हे जवळपास निश्चित झालं आहे.

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत.

परंतु या दोन्ही याद्यांमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे खडसेंच्या उमेदवारीकडे लक्ष लागले होते.

परंतु आपल्याला उमेदवारी मिळणार नाही, हे खडसे यांनी आज स्पष्ट केले. दरम्यान, खडसे यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी खडसे यांना अपक्ष निवडणूक लढावी, अशी मागणी केली आहे.

खडसे म्हणाले की, मला उमेदवारी दिली जाणार नाही. दरम्यान पक्ष मला जो आदेश देईल, मी त्याचं पालन करेन. मी पक्षाच्या प्रत्येक आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता आहे.

गेल्या 42 वर्षांपासून मी ते करतोय. अनेकदा मी पक्षाचे अनेक कटू निर्णय मान्य केले आहेत.

दरम्यान, एकनाथ खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. मात्र दुसऱ्या यादीतही खडसे कुटुंबियांपैकी कोणाचंही नाव आलेलं नाही. त्यामुळे तिसऱ्या यादीत तरी खडसे किंवा त्यांच्या मुलीचं नाव येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post