रोहित पवारांच्या विरोधात धडाडणार मुख्यमंत्र्यांची तोफ; राम शिंदेंसाठी शुक्रवारी प्रचारसभा


वेब टीम : अहमदनगर
राज्याचे लक्ष वेधले गेलेल्या कर्जत -जामखेड मतदारसंघात पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडणार आहेत.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप,आर पी आय, व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सिद्धटेक येथे शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सभा होणार आहे अशी माहिती पालकमंत्री राम शिंदे यांचे उमेदवार प्रतिनिधी तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यांनी दिली.

राम शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कडून शरद पवार यांचे नातू रोहित पवार रिंगणात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घातल्याने पवार यांना ही निवडणूक जड जाण्याची चिन्हे आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post