निवडणूक प्रचारात पावसात भिजावे लागते; आम्हाला अनुभव कमी पडला


वेब टीम : मुंबई
प्रचारादरम्यान पावसात भिजावं लागतं, त्यामध्ये आमचा अनुभव कमी पडला, असे वक्तव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे.

ऑफ कॅमेरा माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी पवारांवर टीका केली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी विरोधकांची भूमिका चोख बजावत असताना सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं.

राजव्यापी दौरे करुन मागील विधानसभेपेक्षा जास्त आमदार निवडून आणले.

यादरम्यान पवारांचं एक पावसातलं भाषण तुफान गाजलं होतं. मुख्यमंत्र्यांनी याच भाषणावरुन शरद पवारांना लक्ष्य केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post