नेवासामध्ये गडाखांना घुलेंची साथ; मुरकुटेना धोक्याची घंटा


वेब टीम : अहमदनगर
विधानसभा निवडणुकीसाठी नेवासा तालुक्यामध्ये राजकीय घडामोडी वेग घेतला असून, क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून उभे राहिलेल्या शंकराव गडाख यांना माजी आमदार चंद्रशेखर व नरेंद्र घुले यांची साथ मिळणार आहे.

Mr.dnalive24.com

यासंदर्भात भेंडा खुर्द येथे काशिनाथ अण्णा यांच्या वस्तीवर अतिशय महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. घुलेंनी गडाखांना साथ दिल्यास भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना ही धोक्याची घंटा समजली जात आहे.

Mr.dnalive24.com

 माजी आमदार शंकराव गडाख, प्रशांत गडाख व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यासह निवडक कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.

मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळेस घुले व गडाख यांच्यात वितुष्ट आले होते. त्यावेळी घुलेंनी विरोधात काम केल्यानेच आमदरकीला पराभव झाल्याचा आरोप गडाखांनी केला होता.

Mr.dnalive24.com

आजच्या बैठकीत घुलेंनी विधानसभेला मदत करण्याचे मान्य केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे गडाखांचा विधानसभा निवडणूक सोपी होऊ शकते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post