अनंतनागमध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला


वेब टीम : अनंतनाग
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे शुक्रवारी रात्री उशिरा अतिरेकी हल्ला झाला.

यात दहा नागरिक जखमी झाले.दहशतवाद्यांनी पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाच्या समोर ग्रेनेड फेकून हल्ला केला.

या घटनेनंतर परिसरात शोधमोहीम वाढवली आहे. या हल्ल्यातील जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

हल्लेखोरांच्या निशाण्यावर डीसी कार्यालयाच्या बाहेर तैनात असलेले कर्मचारी होते.

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यात दहा जण जखमी झाले. यात एक पोलीस कर्मचारी, एक पत्रकार आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

जखमींना उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. हल्ल्यानंतर तातडीने सुरक्षा दलाची कुमक वाढवली आणि परिसराला घेराव घातला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post