जानेवारीत क्रिकेटचा थरार; एकोणवीस वर्षांखालील विश्वचषकाची घोषणा


वेब टीम : दिल्ली
२०२० वर्षाच्या सुरुवातीलाच क्रिकेट प्रेमींना विश्वचषकाचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

आयसीसीने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेची घोषणा केली असून, १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा रंगणार आहे.

गतविजेत्या भारताचा अ गटात समावेश करण्यात आला आहे.

२०२० विश्वचषकासाठी अशी असेल गटवारी –
अ गट – भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, जपान
ब गट – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, नायजेरिया
क गट – पाकिस्तान, बांगलादेश, झिम्बाब्वे, स्कॉटलंड
ड गट – अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, युएई, कॅनडा

याचसोबत सर्व संघाना सरावासाठी आयसीसीने १२ ते १५ जानेवारीदरम्यान जोहान्सबर्ग आणि प्रिटोरीया येथे सराव सामने आयोजित केले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post