चीनने भारताच्या अंतर्गत बाबीत ढवळाढवळ करू नये: भारताने फटकारले


वेब टीम : दिल्ली
ज्याप्रमाणे भारत दुसऱ्या देशांच्या अंतर्गत विषयावर भाष्य करत नाही. त्याप्रमाणे चीनसह अन्य देशांनी भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करु नये असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याच्या निर्णयावर टीका करणाऱ्या चीनला भारताने खडेबोल सुनावले आहेत.

जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याचा भारताचा निर्णय बेकायद आणि निरर्थक असल्याची टीका चीनने केली होती.

त्यावर परराष्ट्र मंत्रालयाने अत्यंत कठोर शब्दात चीनला प्रत्युत्तर दिले आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. त्यानंतर तीन महिन्यांनी बुधवार मध्यरात्रीपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन नवे केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत.

जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्याच्या निर्णयामुळे आपल्या सप्रभुतेला आव्हान निर्माण होत असल्याचा आक्षेप चीनने घेतला आहे.

भारताचा निर्णय बेकायद आणि निरर्थक असून त्याचा काहीही परिणाम होणार नाही. चीनच्या नियंत्रणाखाली जो भाग आहे ते सत्य बदलणार नाही.

चीनच्या अंखडतेचा भारताने आदर करावा आणि सीमावर्ती भागात शांतता राहिल याची काळजी घ्यावी असे चीनच्या परराष्ट्र मंत्रलायने म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post