भारत- बांग्लादेश दरम्यान होणार पहिला 'डे-नाईट' कसोटी क्रिकेट सामना


वेब टीम : दिल्ली
भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

हा कसोटी सामना भारत आणि बांगलादेश या दोनही संघांचा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बांगलादेश क्रिकेट मंडळासमोर (बीसीबी) याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता.

बांगलादेश क्रिकेट मंडळाने याबाबत होकार दर्शवला.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने या वृत्ताला दुजोरा दिला. २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान हा दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यात येणार आहे.

दिवस-रात्र कसोटी ही खूपच चांगली संकल्पना आहे. कसोटी क्रिकेटला पाठिंबा देणे आणि प्रेरणा मिळणे आवश्यक आहे.

मी आणि माझे सहकारी यासाठी कटिबद्ध आहोत. याशिवाय दिवस-रात्र कसोटी खेळण्याची तयारी दर्शवल्याबद्दल विराट आणि सर्व क्रिकेटपटूंचेही आभार, असे गांगुली म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post