भारत-पाकिस्तानने केला 'हा' करार; 'असा' होणार फायदा


वेब टीम : लाहोर
भारत आणि पाकिस्तानमध्ये गुरुवारी ऐतिहासिक ’कर्तारपूर कॉरिडॉर’चा करार करण्यात आला.

पाकिस्तानातील नारोवाल जिल्ह्यातील कर्तारपूर येथे असलेल्या गुरुद्वारा (दरबार साहिब) येथे भारतातील शीख बांधवांसह इतर भारतीयांनादेखील आता जाता येणार आहे.

कॉरिडॉर खुला झाल्यानंतर ऑनलाइन रजिस्ट्रेशन तत्काळ सुरू करण्यात आले असून, प्रत्येक भाविकाला वीस डॉलर इतके शुल्क पाकिस्तानने आकारले आहे.

शीख बांधवांची दीर्घ काळापासूनची मागणी हा करार झाल्यामुळे आता पूर्ण झाली आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये नारोवाल जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेपासून चार किलोमीटर अंतरावर दरबार साहिब गुरुद्वारा आहे.

हा कॉरिडॉर भारतातील पंजाब प्रांतातील डेरा बाबा नानक आणि पाकिस्तानातील कर्तारपूरमधील गुरुद्वारा यांना जोडेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post