पाकची केली स्तुती; मलेशियाला भारत घडविणार अद्दल


वेब टीम : दिल्ली
भारत मलेशियाकडून होणाऱ्या पामतेल आणि अन्य उत्पादनांच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा विचारात आहे.

काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर मलेशियाने टीका केली होती. त्यामुळे भारत सरकार मलेशियाकडून होणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर निर्बंधाचा विचार करत आहे.

मलेशियाकडून पाम तेल आणि अन्य उत्पादनांची आयात कमी करण्याचा भारत सरकारचा विचार आहे.

त्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने बैठक आयोजित केली होती.ही माहिती या बैठकीत सहभागी झालेल्या सरकारी आणि उद्योग जगतातील सूत्रांनी दिली.

भारताने आक्रमण करुन जम्मू-काश्मीर ताब्यात घेतले.भारताने पाकिस्तानसोबत चर्चा करुन तोडगा काढावा असे वक्तव्य मलेशियाचे पंतप्रधान माहाथीर मोहम्मद यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये केले होते.

मलेशियन पंतप्रधानांच्या या विधानावर मोदी सरकार नाराज आहे.भारत सरकारने ५ ऑगस्टला संसदेच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर करुन जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले होते.

भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड गदारोळ केला.पण टर्की, मलेशिया आणि चीन वगळता पाकिस्तानला कुठल्याही देशाचा पाठिंबा मिळाला नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post