खुशखबर! अखेर देशातून मान्सून परतला


वेब टीम : पुणे
राज्यातील बहुतांश भागांतून मान्सून परतला असल्याची घोषणा मंगळवारी हवामान विभागाने केली होती.

त्यानंतर संपूर्ण देशातून मान्सून परतला असल्याचे हवामान विभागाने बुधवारी जाहीर केले आहे. मान्सून परतल्यामुळे राज्यभरातील पावसाची व्याप्ती घटली आहे.

कोकणातील काही ठिकाणांचा अपवाद वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात दिवसभर हवामान कोरडे होते.

यावेळी 5 ऑक्टोबर पासून राजस्तान येथून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. राजस्तान पाठोपाठ उत्तर भारतातील बहुतांश राज्यातून मान्सून वेगाने परतत होता.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातून 15 ते 16 ऑक्टोबर पासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

मात्र प्रत्यक्षात दोन दिवस आधीच राज्यातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला प्रारंभ झाला.

मंगळवारीच राज्याच्या बहुतांश भागातून मान्सून परतला असल्याची घोषणा हवामान विभागाने केली. त्याच्या दुसर्‍याच दिवशी संपूर्ण देशभरातून मान्सून परतला आहे.

मान्सून परतल्याने कोकण, गोव्याच्या बर्‍याच भागात कमाल तपमान सरासरीच्या तुलनेत लढणीय वाढ झाली.

मराठवाड्यातील काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तपमान सरासरीच्या जवळपास होते.

मान्सून परतल्याने राज्यभरातील पाऊसही परतला आहे. ठिकठिकाणी तपमानात वाढ झाल्याने उकाडाही वाढला आहे.

सकाळपासून दुपारनर्यंत लोकांना ऑक्टोबर हिटचा चटका सहन करावा लागत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post