वेब टीम : पुणे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेल्या असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची सभा कुठे घ्यायची याचे को...
वेब टीम : पुणे
विधानसभा निवडणूक तोंडावर आलेल्या असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची सभा कुठे घ्यायची याचे कोडे पडले होते.
न्यू इंग्लिश स्कुल, रमणबाग व टिळक रोड या दोन्ही शाळांनी सभेसाठी मैदान देण्यास नकार दिला होता.
अखेर मनसेला राज ठाकरेंच्या सभेसाठी जागा मिळाली असून येत्या ९ तारखेला शुक्रवार पेठेतील सरस्वती मंदिर संस्थेच्या मैदानात सभा होणार आहे.
सभेला मैदान मिळत नसल्याने टिळक चौकात सभा घेण्यास परवानगी देण्याची मागणी मनसेने केली होती व तिथे सभा घेण्याचा निर्धारही केला होता.
आता मात्र सरस्वती मंदिर संस्थेच्या मैदानातच मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटेल. मनसेने पुण्यात कसबा पेठ, कोथरूड व हडपसर मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत.
COMMENTS