विधानसभेसाठी मोदी- शहांचे 'मिशन महाराष्ट्र' ; असे केले सभांचे नियोजन


वेब टीम : मुंबई
राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा ताकदीने उतरणार आहेत.

महायुतीच्या प्रचारासाठी मोदींच्या ९ तर शहांच्या १८ सभांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, महाराष्ट्रासह हरयानात देखील विधानसभा निवडणूका होणार आहेत.

त्यामुळे महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या केवळ ९ सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

यांपैकी दोन सभा ठरल्या असून १७ ऑक्टोबरला सातारा आणि पुण्यात मोदींची सभा होईल.

राज्यातील इतर ठिकाणच्या सभांचे नियोजन सुरू आहे. अमित शहांच्या सभांचे नियोजनही लवकरच करण्यात येईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post