पतीने पत्नीला मारून टाकले ; मृतदेह पुरला घरासमोर


वेब टीम : अहमदनगर
पती-पत्नीच्या नेहमीच्या भांडणाला कंटाळून पतीने पत्नीचा दोरीने गळा आवळून खुन केला. त्यानंतर मृतदेह घराच्या जवळ असलेल्या शेडलगत खड्डा घेवून अर्धवट पुरला.


ही घटना नगर तालुक्यातील दरेवाडी येथे घडली आहे. याबाबत भिंगार कॅम्प पोलिसांनी आरोपी पतीस महादेव संभाजी आगासे यास ताब्यात घेतले आहे.

राजनंदा महादेव आगाशे (वय- 50) असे मयत महिलेचे नाव आहे. कामानिमित्त नांदेड येथून आलेले आगाशे कुटुंब चार वर्षांपासून दरेवाडी येथे स्थायिक आहे. मयत राजनंदा या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. त्या पती, दोन मुले व सुनांसह राहत होत्या.

बुधवारी सकाळी आगाशे यांच्या घराजवळ दुर्गंधी येऊ लागल्याने ग्रामस्थांनी भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी सहायक पोलीस निरिक्षक प्रवीण पाटील, उपनिरिक्षक गायकवाड, देशमुख, राजू सुद्रीक यांचे पथक दाखल झाले.

दुर्गंधी येत असलेल्या ठिकाणची माती उकरली तेव्हा राजनंदा यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांनी नातेवाईकांकडे चौकशी केली. या घटनेबाबत नातेवाईकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी चौकशीसाठी मयत महिलेच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत मृत महिलेचा भाऊ मेघराज हरीभाऊ रोडे (वय-35 रा. मिरगाने, रा. दरेवाडी) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post