सहानुभूतीचा प्रकार उघड; परळीत घड्याळाचाच होणार गजर : धनंजय मुंडे


वेब टीम : बीड
निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून परळीत घड्याळाचा गजर सुरु आहे. निकालाच्या दिवशीही तेच दिसणार आहे असा विश्वास राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

राज्याचं लक्ष लागून असलेल्या परळी मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंडे म्हणाले की, मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली आहे. परतीचा पाऊस जिल्ह्यात सुरु होणार आहे.

मतदारसंघात परिवर्तन होणार आहे. ज्यांनी वाईट केलं, सहानुभूती मिळविण्याचा जो प्रकार घडला हे जनतेसमोर आलेलं आहे.

२४ तारखेला निकालातून कोणाचा पराजय होईल हे स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितले.

माझ्यावर खोटे आरोप करण्यात येत असून आम्हा बहिण भावांमध्ये कोणीतरी नवीन आलेले भाऊ विष कालवत असल्याचे धनंजय मुंडेंनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post