रुग्णवाहिकाच मिळाली नाही; 'या' मराठी अभिनेत्रीचा प्रसूतीनंतर मृत्यू


वेब टीम : हिंगोली
मराठी कलाकार पूजा झुंजार हिचा रुग्णवाहिके अभावी प्रसूतीनंतर दुर्देवी मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात घडला.

पूजाच्या नवजात बालकाचाही मृत्यू झाला. जर वेळेत रुग्णवाहिका मिळाली असती तर पूजाचे प्राण वाचले असते असे तिच्या नातेवाईंकांनी म्हटले आहे.

पूजाला प्रसूती कळा सुरु झाल्याने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला दाखल केले होते.

पूजाने एका मुलाला जन्म दिला मात्र ते काही मिनिटांतच दगावले. त्यानंतर तिची प्रकृती खालावली.

तातडीनं हिंगोलीमधील रुग्णालयात तिला हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी कुटुंबीयांना दिला.

हे रुग्णालय ४० किलोमीटर लांब होते.मात्र पूजाला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नव्हती.

बऱ्याच वेळाने तिच्या कुटुंबीयांनी खासगी रुग्णवाहिकेची सोय केली. मात्र वाटेतच पूजाला प्राणांना मुकावे लागले.

यासाठी प्रशासनाच्या ढीसाळ कारभारास पूजाच्या नातेवाईकांनी जबाबदार धरले. पूजाने दोन मराठी चित्रपटांत काम केले.

गर्भवती असल्याने काही काळ चित्रपटसृष्टीतून विश्रांती घेतली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post