आमची ताकद आता इतकी वाढलीये की मुख्यमंत्र्यांनाही भीती वाटू लागलीये : प्रकाश आंबेडकर


वेब टीम : मुंबई
३० ते ३५ टक्‍के ओबीसींच्या छोट्या जाती, पोटजाती मतदार हा राज्यभरात पसरलेला आहे. तो काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बाजूने नाहीच.

त्यातील २० टक्‍के मतदार आमच्या बाजूने आला आहे,यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. आमची ताकद इतकी वाढलीय, की त्याची भीती मुख्यमंत्र्यांनाही वाटू लागलीय.

मनाची तयारी करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केलाय. ‘वंचित’ची धाव विरोधी पक्षनेतेपदापर्यंत असेल, असं लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय.

पण, विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर आमचा सरकार स्थापन करण्याचा दावा राहणार आहे. असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

एका वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

ते म्हणाले, वंचित हा आता सयुक्‍तिक आणि आवश्‍यक पक्ष ठरू लागलेला आहे. ‘वंचित’कडं भविष्याकडं पाहण्याची क्षमता आहे.

देशाचा सामाजिक स्तर पाहिला, तर या देशातला कारागीरवर्गच भविष्य बघू शकतो. देवळातला वर्ग भविष्य पाहू आणि बदलू शकत नाही.

देवळातला वर्ग स्थिर आणि निष्क्रिय (स्टॅटिक) असणं, अशा राजकीय व्यवस्थेला फायदेशीर असतं. त्यामुळेच राज्यातल्या ‘आरएसएस’च्या सरकारला ही परिस्थिती अशीच राहावी, असं वाटतं.

त्यामुळेच सामाजिक, आर्थिक, संशोधनाच्या पातळीवर एक प्रकारची कुंठित अवस्था आलेली आहे. ही नैसर्गिक नव्हे; मनुष्यनिर्मित अवस्था आहे.

या कारागीरवर्गाला ज्याला आपण बारा बलुतेदार म्हणतो; त्याला काळाबरोबर चालावं लागतं, तरच तो टिकू शकतो.

बदल करू शकणाऱ्या बारा बलुतेदारांचं राजकीय संघटन वाढवणे आवश्‍यक झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post