भारताला फ्रान्सकडून मिळाले पहिले राफेल फायटर एअरक्राफ्ट, संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते शस्त्रपूजन


वेब टीम : पॅरिस
दसऱ्याच्या मुहूर्तावर पहिलेराफेल विमानघेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मंगळवारी पॅरिसमध्ये पोहोचले.

फ्रान्सच्या मेरिनेकहवाई तळावर फ्रान्सने हे विमान भारताच्या संरक्षण मंत्र्यांना सुपूर्द केले. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये राफेलवर लावलेल्या शस्त्रांची पूजा केली.

विजयादशमी आणि हवाई दल स्थापना दिवस असल्याने आजचा दिवस प्रतिकात्मक असल्याचे यावेळी बोलताना राजनाथ म्हणाले आहेत.

यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, आज विजयादशमी आणि भारतीय हवाई दल स्थापना दिवस आहे. आजचा दिवस प्रतिकात्मक आहे.

राफेल विमान राफेल एअरक्राफ्टची डिलिव्हरी निश्चित वेळेवर होत आहे. सर्वच 36 राफेल विमानांची डिलिव्हरी शस्त्रास्त्रांसह वेळेवर होईल अशी अपेक्षा फ्रान्सकडून ठेवतो.

आमचे लक्ष्य हवाई दलास समृद्ध करणे आणि वाढवणे आहे. सोबतच, फ्रान्सने केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद, हे भारताच्या संरक्षण आणि इतर गोष्टींसाठी अतिशय महत्वाचे आहे.

जगातील दोन मोठ्या लोकशाही देशांमध्ये सहकार्य वाढत राहील आणि पर्यावरण संतुलन देखील स्थापित करण्यात यश मिळेल. राफेल विमानात उड्डान भरणे एक अभिमानास्पद गोष्ट आहे.

एमबीडीएचे भारताचे प्रमुख लुइक पिडेवाशे म्हणाले, भारताला राफेलमुळे नवीन क्षमता मिळेल. आतापर्यंत देशाकडे ही क्षमता नव्हती. स्कॅल्प व मिटिऑर क्षेपणास्त्रे भारतीय हवाई दलासाठी गेमचेंजर म्हणून सिद्ध होतील.

दुसरीकडे भारताने सामरिक आघाडीला बळकट करण्यासाठी फ्रान्सची कंपनी डॅसो एव्हिएशनसोबत तीन वर्षांपूर्वी पहिला करार केला होता. त्याअंतर्गत भारताला ५९ हजार कोटी रुपयांमध्ये ३६ राफेल विमाने मिळतील.

गेल्या आठवड्यात हवाई दल प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर एअरचीफ मार्शल आर.के. एस. भदौरिया यांनी ८ ऑक्टोबरला भारताला राफेल मिळणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु लष्करी आघाडीवर सज्ज करण्यासाठी विमाने तूर्त फ्रान्समध्ये ठेवली जातील.

ही चार विमाने पुढील वर्षी मेमध्ये भारतात येतील आणि हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होतील.

मिटिऑर हवेतील कोणत्याही हल्ल्यास रोखण्यात सक्षम आहे. हे नेक्स्ट जनरेशनचे क्षेपणास्त्र आहे, असे ल्यूकस यांनी सांगितले.

एमबीडीएने ब्रिटन, जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन व स्वीडन यांच्या मागणीनुसार ते तयार केले आहे. हे क्षेपणास्त्र अॅडव्हान्स रडारद्वारे नियंत्रित केले जाते.

कोणत्याही वातावरणात राफेल लढाऊ विमान तसेच मानवरहित विमानांना उद्ध्वस्त करू शकते. सर्जिकल स्ट्राइकच्या दृष्टीने आखल्या जाणाऱ्या मोहिमांत ते अत्यंत प्रभावीपणे व सहज काम करते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post