वेब टीम : अहमदनगर आज मला अर्ज भरायच्या वेळेस शक्तिप्रदर्शन करण्यात येणार होते. त्यासाठी तयारीही केली. आज अचानक झालेल्या पावसाने मतदारसं...
वेब टीम : अहमदनगर
आज मला अर्ज भरायच्या वेळेस शक्तिप्रदर्शन करण्यात येणार होते. त्यासाठी तयारीही केली. आज अचानक झालेल्या पावसाने मतदारसंघात चांगली हजेरी लावली.
या पावसामुळे लोकांमध्ये चर्चा आहे की कालची घाण धुवून निघाली, आशा शब्दात पालकमंत्री राम शिंदे यांनी रोहित पवारांवर नाव न घेता टीका केली.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीतर्फे पालकमंत्री राम शिंदे यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शुक्रवारी दुपारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शहरातून रॅली काढत शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
"राम शिंदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी शहर दणाणून सोडले. उमेदवारी अर्ज दाखल करताना जलसंपदा मंत्री महाजन, आमदार मोनिका राजळे, अंबादास पिसाळ हे उपस्थित होते. अर्ज दाखल झाल्यानंतर कार्यकर्ता मेळावा सुरु आहे.
COMMENTS