कणकवलीत शिवसेनाच; एक्झिट पोलमध्ये राणेंचा पराभव


वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुकीत सर्वात लक्षवेधी ठरलेली कोकणातील कणकवली मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

कणकवली मतदारसंघात भाजपाचे नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेचे सतीश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मतदारसंघात प्रचारासाठी आले होते. 

राज्यभरात युतीत लढणारी भाजपा-शिवसेना या मतदारसंघात मात्र एकमेकांविरोधात दंड थोपटून ऊभी होती.

गुरूवारी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. तत्पुर्वी काही माध्यमसंस्थांनी केलेल्या एक्झीट पोल सर्व्हेनुसार कुठे कोण बाजी मारणार आणि कोणाचा पराभव होणार याविषयी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

एक्झीट पोल सर्व्हेमध्ये मतदानानंतर मतदारांकडून घेतलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया असतात.

त्यामुळे मतदान झाल्यानंतर जाहीर झालेल्या विविध एक्झिट पोल नुसार कणकवली मतदारसंघातून नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांचा पराभव होणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 त्यामुळे प्रत्यक्ष मतमोजणीत आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post