आमच्या जागा कमी आल्या म्हणून आम्ही ईव्हीएमवर शंका घेतली नाही : रावसाहेब दानवे


वेब टीम : भोकरदन
निवडणुकीच्या आधी ईव्हीएमच्या नावाने बोंबा मारणारे काँग्रेस – राष्ट्रवादी आता गप्प का आहेत ?

आता त्यांना ईव्हीएमवर शंका का नाही? असा प्रश्न भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, यावेळी सातारा, बारामती, तासगाव, परळी या भागांतून मोठ्या मताधिक्याने उमेदवार विजयी झाले तरी काँग्रेस – राष्ट्रवादीने ईव्हीएमबाबत बोंब मारली नाही.

भाजपला जास्त जागा मिळाल्या तर ईव्हीएम ‘हॅक’ आणि त्यांचे उमेदवार लाखांनी निवडून आले तर स्वबळावर! असे काँग्रेस – राष्ट्रवादीचे ढोंग आहे, असा टोमणा दानवे यांनी मारला.

आमचे २२० आमदार निवडून येतील, असा आमचा अंदाज होता; १६५ निवडून आले. आम्ही ईव्हीएमच्या नावाने बोंबा न मारता जनतेचा कौल स्वीकारला.

काँग्रेस – राष्ट्रवादीनेही असा प्रामाणिकपणा दाखवावा, असा टोला दानवे यांनी मारला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post