वेब टीम : अहमदनगर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील लढतीत रोहित राजेंद्र पवार यांचा अर्ज बाद झाल...
वेब टीम : अहमदनगर
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील लढतीत रोहित राजेंद्र पवार यांचा अर्ज बाद झाला आहे.
कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात एकूण 27 नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. त्यापैकी 16 उमेदवारांचे 23 नामनिर्देशन पत्र पात्र झाले असून 4 उमेदवारांचे 4 नामनिर्देशन पत्र अपात्र झालेले आहेत.
मात्र अर्ज बाद झालेले रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू नसून दुसरेच त्याच नावाचे उमेदवार आहेत.
यापैकी पात्र उमेदवार असे, रामदास शंकर शिंदे - भारतीय जनता पार्टी, रोहित राजेंद्र पवार-राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष, शंकर मधुकर भैलुमे -बहुजन समाज पार्टी, अरुण हौसराव जाधव-वंचित बहुजन आघाडी, अप्पासाहेब नवनाथ पालवे -महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सोमनाथ भागचंद शिंदे-जनहित लोकशाही पार्टी, अशोक सर्जेराव पावणे-अपक्ष, उत्तम फकिरा भोसले-अपक्ष,किसन नामदेव सदाफुले-अपक्ष, गोविंद लक्ष्मण आंबेडकर-अपक्ष, बजरंग मनोहर सरडे-अपक्ष, महारुद्र नरहरी नागरगोजे-अपक्ष, राम रंगनाथ शिंदे-अपक्ष, सुमीत कन्हेय्या पाटील -अपक्ष, शहाजी राजेंद्र काकडे-अपक्ष, ज्ञानदेव नरहरी सुपेकर-अपक्ष यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
तर शेख युनुस दगडू, रोहित राजेंद्र पवार (पिंपळवाडी तालुका पाटोदा), रावसाहेब मारुती खोत, आशाबाई रामदास शिंदे हे चार उमेदवार अपात्र ठरलेले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचा अर्ज मात्र वैध ठरला आहे.
अर्ज बाद झालेले रोहित राजेंद्र पवार पाटोदा तालुक्यातील पिंपळ वाडी येथील रहिवासी आहे.
शेख युनूस दगडू व रोहित राजेंद्र पवार हे अपूर्ण शपथपत्र दिलेने अपात्र झाले असून, रावसाहेब मारुती खोत हे अनामत रक्कम अपुरी असलेने अपात्र झाले. तर आशाबाई रामदास शिंदे या भारतीय जनता पार्टीचा पर्यायी उमेदवार म्हणून नमुना ब मध्ये उल्लेख असलेने मात्र मुख्य उमेदवार चा अर्ज पात्र झाल्याने अपक्ष उमेदवारसाठी आवश्यक पात्रता पूर्ण केली नसल्याने अपक्ष उमेदवार म्हणून अपात्र झाले आहेत.
COMMENTS