रोहित शर्माचा षटकारांचा 'हा' नवा विक्रम


वेब टीम : दिल्ली
भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ अशी ओळख असलेल्या रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी षटकारांच्या नव्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे.

रोहित शर्माने आता कसोटी, एका दिवसाच्या आणि टी-२० या तिन्ही प्रकारांत एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम केला.

रोहित शर्माने २०१३ मध्ये खेळल्या गेलेल्या एका एका दिवसाच्या सामन्यात १६ षटकार ठोकले होते.

त्यानंतर त्याने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना टी-२० सामन्यात एकूण १० षटकार ठोकले होते.

तर रोहित शर्माने सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आतापर्यंत १० षटकार ठोकले आहेत.

याप्रकारे रोहित शर्माने भारताकडून खेळताना तिन्ही फॉर्मेटमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकणार तो एकमेव खेळाडू बनला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post