शिवसेनेची साथ सोडणं भाजपला महागात पडेल : शरद पवारांच्या सल्ला


वेब टीम : मुंबई
शिवसेनेची साथ सोडणं भाजपला महागात पडेल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले . जनतेनं आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे.

सेना-भाजपची युती आधीच ठरली आहे.  त्यामुळे भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीची मदत घेणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.

शिवसेना-भाजप कोणता फॉर्म्युला  वापरणार? मुख्यमंत्री कुणाचा होणार? याकडे सगळ्यांचं  लक्ष लागून राहिलं आहे.

शिवसेना-भाजप ५०-५० चा फॉर्म्युला  वापरणार का? अशीदेखील चर्चा रंगली आहे.

असं असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि यंदाच्या निवडणुकीत ‘गेम चेंजर’ ठरलेले शरद पवार यांनी महायुतीबद्दल महत्त्वाचं  वक्तव्य केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post