मी मेल्या आईचं दूध पिलेलो नाही, ईडीला 'येडी' करून सोडेल : शरद पवार


वेब टीम : पंढरपूर
आजच्या सरकारच्या विरोधात कोणी बोललं तर त्याला देशद्रोही ठरवलं जातं. सरकार गुन्हेगारांवर कारवाई न करता सरकारविरोधात जे बोलतात त्यांच्यावरच इडीचं हत्यार वापरतात.

आता तुमची इडी असो किंवा काही तिला येडी केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला लगावला.

राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भेलके यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. सरकारी यंत्रणांचा वापर गुन्हेगारांऐवजी राजकीय विरोधकांवर होत आहे.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम, कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वरा यांना तुरुंगात डांबले आहे. मात्र, मला इडीची भीती दाखवू नका.

मी मेल्या आईचे दूध पिलेलो नाही. तुमची इडी असो किंवा काही तिला येडी केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असं पवार म्हणाले.

‘देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचा इतिहास नव्याने लिहिण्याबाबत वक्तव्य केले होते. राज्य सरकारने चौथीच्या पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराजांवरील धडा वगळल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

ही गंभीर बाब आहे. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे संस्कार लहान मुलांच्या अभ्यासात ठेवणे आवश्यक असताना ते काढण्याचे पाप हे सरकार करत आहे.

छत्रपतींच्या पराक्रमाचा इतिहास असलेल्या गडकिल्ल्यांवर आता हे दारूचे अड्डे आणि छमछम सुरु करायला निघाले आहेत, हेच करायचे असेल तर जाना मोडनिंबला.

तुम्ही दुसऱ्याला उभे करता आणि कुस्तीची भाषा करता; आमचे पैलवान तुम्हाला कसं चितपट करतात हे २४ तारखेला दिसेल,’ अशी टीकाही पवारांनी यावेळी बोलताना केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post