बहिणाबाई शब्दामुळे पंकजांना चक्कर का आली ? : शरद पवार


वेब टीम : मुंबई
काल मी टीव्हीवरत्यांची सभा बघत होतो, त्यावेळी त्यांनी आमच्या विरोधी पक्षनेत्यांबद्दल आरोप केले होते. त्यांनी ४० मिनिटे भाषण केलं. तो त्यांचा नैतिक अधिकार आहे.

पण त्यानंतर त्यांना चक्कर आली. मला समजत नाही, तुम्ही ४० मिनिट भाषण करू शकता, मात्र त्यानंतर तुम्हाला चक्कर कशी येते?” असा प्रश्न शरद पवार यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर उपस्थित केला.

पवार यांनी सकाळी मुंबईतील मलबार हिल येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली.

ते म्हणाले की, मी चौकशी केली मी पंकजांचे एक स्टेमेंट पाहिले. त्यात बहिणाबाई असा माझा उल्लेख केला. हा शब्द काही योग्य नाही. बहिणाबाई असा उल्लेख करणं योग्य नाही.

हे वक्तव्य मला अतिशय यातना देणारं आहे वगैरे असं त्या म्हणाल्याचं मी ऐकलं. मला वाटतं बहिणाबाई या शब्दामध्ये एक आदर आहे.

महाराष्ट्रामध्ये बहिणाबाईंच्या कविता आम्ही लहानपणापासून घोकल्या आहेत. बहिणाबाईंनी अनेक विचार त्यांच्या कवितांमधून मांडले.

त्याचा स्वीकार महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्राने अगदी आनंदाने केला. त्यामुळे बहिणाबाई या नावातच आदर आहे.

त्यामुळे बहिणाबाई या शब्दामुळे यातना का होतात अन् चक्कर का येते हे मला महिती नाही

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post