शाहू महाराजांच्या नगरीत वेगळ्या विचारांच्या शक्ती मोठ्या होतातच कशा? : शरद पवार


वेब टीम : कोल्हापूर
राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीतून वेगळ्या विचाराच्या शक्ती मोठ्या होतात याचा धक्का बसतो, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते.

राधानगरी मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार माजी आमदार के. पी. पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांची मुदाळ येथे शुक्रवारी सायंकाळी प्रचारसभा झाली.

आज सकाळी ते पुढील प्रचारासाठी रवाना झाले, तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, कोल्हापुरातील विचारांशी ते जुळत नाही, त्यामध्ये आता बदल करायचा आहे. महाआघाडी मधील प्रत्येक उमेदवार आपला समजा.

त्याचा प्रचार करा. येथे पुरोगामी विचारांशी तडजोड होत नाही हे दाखवून द्या, त्यांना विजयी करून दाखवा. असे आवाहन त्यांनी केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज सकाळी लवकर शरद पवार यांची भेट घेतली.

स्वाभिमानाचे नेते राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी.एन. पाटील आदींनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली.

निवडणुकीतील यशाबाबत पवार यांनी त्यांच्याशी कानगोष्टी केल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post