वादग्रस्त श्रीपाद छिंदम विधानसभेच्या आखाड्यात


वेब टीम : अहमदनगर
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले नगर महापालिकेचे नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना नगर शहर मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. पक्षाकडून ‘एबी’ फार्म मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करत बाजी मारली. विधानसभा निवडणुकीत बसपाच्या माध्यमातून आखाड्यात उतरत नशीब आजमावण्याचा प्रयत्न आहे. छिंदमची उमेदवारी कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाला मारक ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

छिंदम यांना वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमहापौर पद गमवावे लागले होते. त्यानंतर मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. त्यात त्यांनी शिवसेना, भाजपच्या उमेदवारांवर मात केली.

आता त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. बहुजन समाज पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post