धनंजय मुंडे तुम्ही पुढची २५ वर्षे पडायची तयारी ठेवा : धस


वेब टीम : बीड
बीड जिल्ह्यातील भाजपचे नेते सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे .

परळीत फक्त बहिणीची हवा आहे हे भावांनी लक्षात ठेवावं. त्यामुळे धनंजय मुंडे तुम्हीं पुढची 25 वर्ष पडायची तयारी ठेवा, अशा शब्दात धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला .

बीड जिल्ह्यात पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री, शाह आणि पंकजा मुंडे यांचाच गाजावाजा आहे .

पंकजाताईच्या पक्षात मेगाभरती सुरु आहे, तर राष्ट्रवादीत मेगा गळती सुरु आहे. असा टोलाही धस यांनी धनंजय मुंडेंना लगावला आहे.

‘मागच्या दराने येणाऱ्याला पुढचा दरवाजा दिसणारं नाही. ए भावा कुणाची हवा? अरे परळीत तर फक्त बहिणीचीच हवा असं म्हणत मतदार संघाच्याच नव्हे तर राज्याच्या हितासाठी पंकजाताई मुंडे यांच्या पाठिशी ताकद उभी करा असं आवाहन धस यांनी मतदारांना केले आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post