'या' दोन मोबाईल कंपन्या नोव्हेंबरपासून होणार बंद; तुमचा तर नंबर बंद होणार नाही ना?


वेब टीम : दिल्ली
जर तुम्ही एअरसेल आणि डिशनेट वायरलेसचे युजर्स असाल तर ३१ ऑक्टोबरनंतर तुमचा मोबाइल क्रमांक बंद होईल.

तुमची सेवा सुरू ठेवण्यासाठी या कंपनीची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना ३१ ऑक्टोबरपूर्वी आपला क्रमांक दुसऱ्या सेवा कंपनीवर पोर्ट करावा लागेल.

ट्रायच्या अहवालानुसार या कंपन्यांचे सध्या ७ कोटी ग्राहक आहेत. जर तुम्ही ३१ ऑक्टोबरपूर्वी मोबाइल क्रमांक पोर्ट न केल्यास संबंधित क्रमांक कायमचा बंद होईल.

रिलायन्स जिओच्या बाजारातील आगमनानंतर बऱ्याच कंपन्यांचे धाबे दणाणले होते. तर काही कंपन्या बंदही झाल्या होत्या.

२०१६ ते २०१७ या कालावधीत तग धरल्यानंतर २०१८ च्या सुरूवातीला एअरसेलने आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

यानंतर एअरसेलने ट्रायचा दरवाजा ठोठावला होता. त्यानंतर कंपनीने आपल्या युजर्ससाठी युनिक पोर्टिंग कोडची सुविधा दिली होती.

पंरतु आता ३१ ऑक्टोबरपर्यंतच एअरसेलला सेवा देता येणार असल्याचे ट्रायने स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post