काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मदतीने झाला विजय; 'या' आमदाराने आता दिला भाजपला पाठिंबा


वेब टीम : मुंबई
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने विजयी झालेले अपक्ष आमदार रवि राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रवि राणा यांनी पाठिंब्याच्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र मजबूत होण्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच मुखमंत्री झाले पाहिजेत.

महाराष्ट्र राज्याचे व जनतेचे प्रश्न सुटतील. फडणवीस हेच बडनेरा मतदारसंघाचा विकास करतील. यासाठी मी फडणवीस यांना बिनशर्त पाठिंबा देतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post