बाळासाहेब थोरात यांचे नेते बँकॉकमध्ये : उद्धव ठाकरे


वेब टीम : संगमनेर
काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांचे नेते (राहुल गांधी) बँकॉकमध्ये सुट्टी घालवत आहेत.

राज्यातील नेत्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडले असून, संगमनेर मध्ये संगमनेरमध्ये नवले नवल घडवणार, संपूर्ण जिल्ह्यात भगवा फडकणार असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संगमनेरमध्ये सभा घेतली.
ते म्हणाले की, शेतकऱ्यांना फक्त कर्जमुक्त नाही तर चिंतामुक्त करणार आहे. एका रुपयात प्राथमिक आरोग्य चाचणी जनतेला आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. काँग्रेसला ६० वर्षे देऊनही कामे केले नाही.

यावेळी उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस सभेस उपस्थित होते. तेजस सभा बघायला आहे, तो जंगलात रमणारा आहे. असे उद्धव म्हणाले.

यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे हेदेखील उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post