भाजपची अडचण समजून घेत युती केली : उद्धव ठाकरे


वेब टीम : मुंबई
‘स्वबळावर लढायचं असेल तर शिवसेना कधीही लढू शकते. पण मी भाजपची अडचण समजून घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला विनंती केली होती. मी त्यांना समजून घेतले.

त्यामुळे युती करताना १२४ जागा घेऊन मी कुठलीही तडजोड केलेली नाही,’ प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या जागावाटपावर बोलताना दिली.

‘सामना ऑनलाईन’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

युती अस्तित्वात असल्यापासून शिवसेना कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत असे परंतु या निवडणुकीत युती करताना कमी जागा घेत सेनेला छोट्या भावाची भूमिका घ्यावी लागली आहे.

या विषयावर संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव म्हणाले, ‘सेनेच्या वाट्याला कमी जागा आल्या आहेत असं दिसत असलं तरी हे तात्कालिक चित्र आहे.

जागांचा आकडा छोटा असला तरी आमदारांचा आकडा मोठा असेल. मी महाराष्ट्राच्या हितासाठी युती केली आहे. भाजपला समजूनही घेतले आहे. हे महाराष्ट्राला माहीत आहे.

महाराष्ट्र हा काही धृतराष्ट्र नाही. केवळ किती जागा लढवतो हे महत्त्वाचं नाही तर अधिकार व जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप हा मुद्दा युतीमध्ये महत्त्वाचा आहे.

युतीचं सरकार सत्तेवर येईल तेव्हा समसमान वाटप काय असतं हे लोकांना कळेल. या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या इतिहासातील सर्वाधिक आमदार निवडून येतील’

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post