अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यात कोण होणार विरोधीपक्षनेता?


वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवसेनेच्या खालोखाल म्हणजेच 54 जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळाला आहे.

त्यामुळे आता विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होणार असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरू आहे.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे या स्पर्धेत सर्वांत आघाडीवर आहेत.

त्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही समर्थपणे सांभाळले आहे.

धनंजय मुंडे यांचे नाव आघाडीवर असले तरी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांचीही नावे शर्यतीत आहेत.

चर्चेनंतर विरोधी पक्षनेता ठरणार : थोरात
५४ जागा जिंकून सर्वांत मोठा विरोधी पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच विधानसभेतील विरोधी पक्षनेता होईल, अशी चर्चा रंगली असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मात्र वेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण होणार याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे बाळासाहेब म्हणाले.

आम्हाला सत्ता स्थापन करण्याइतपत मते मिळाली नसली तरी ज्या जागा मिळाल्या त्या निश्चितच समाधानकारक आहेत अशीही प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post