हरयानात अपक्षांच्या बळावर भाजप सत्ता स्थापन करणार


वेब टीम : चंडीगढ़
हरयाना विधानसभा निवडणुकीत भाजपला जरी स्पष्ट बहुमत मिळालेले नसेल तरीदेखील सर्वात मोठा पक्ष भाजपच ठरलेला आहे. तर अपक्ष आमदारांना बरोबर घेत भाजप पुन्हा सरकार स्थापनेच्या प्रयत्नात आहे.

मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर राज्यपाल सत्यनारायण आर्य यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती आहे. ९० सदस्य संख्या असलेल्या हरयाणा विधानसभेत भाजप ४० जागांवर विजयी झाली आहे.

तर १ जागेवर आघाडीवर आहे. तर बहुमतासाठी भाजपला सहा जागा कमी आहेत. त्यामुळे अपक्ष आमदारांचा पाठिंबा घेत भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.

काँग्रेसला ३१ जागांवर विजय मिळाला आहे. तर जननायक जनता पार्टीला १० जागा मिळाल्या आहेत, तर अपक्ष आमदारांचा आकडा ९ आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांच्या मदतीने सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत.

हरयानात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजप ४० जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमताचा ४६ हा आकडा गाठण्यासाठी भाजपला अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.

याबाबतही ट्विट करताना तेथे भाजपच सरकार स्थापन करणार, असे संकेत शहा यांनी दिले. मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारने हरयानातील जनतेच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

यावेळच्या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल देत जनतेने पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी दिली आहे. या जनादेशासाठी मी जनतेचे आभार मानतो, असे शहा यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post