जिओची मोफत कॉलिंगची सुविधा बंद; फोन लावण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे


वेब टीम : मुंबई
अल्पावधीतच मोफत कॉलिंग सुविधेमुळे प्रसिद्द झालेल्या जिओने आपली मोफत कॉलिंगची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिओच्या वापरकर्त्यांना आता जिओ सोडून इतर कंपनीच्या मोबाईलवर फोन करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

जिओने आपली कॉलिंग पॉलिसी बदलली आहे. नवीन नियमांनुसार आता जिओवरून फोन करणाऱ्या युझर्सला आता प्रति मिनिटाला 6 पैसे द्यावे लागणार आहेत. याआधी ही सेवा जिओकडून फुकटात मिळत होती.

ट्रायने 2017 मध्ये इंटरकनेक्ट युसेज चार्ज (आययूसी) 14 पैशांवरी 6 पैसे प्रति मिनिट केले होते. ट्रायकडून ‘कॉल टर्मिनेशन चार्ज’बाबत नव्याने विचारविनियम सुरू असतानाच मुकेश अंबानी यांनी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने बुधवारी युझर्सला तगडा धक्का दिला.

जिओ नेटवर्कवरून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी आता युझर्सला नवीन नियमानुसार पैसे द्यावे लागणार आहे. जिओने याबाबत एक पत्रक काढून माहिती दिली आहे.


जिओ कंपनीच्या सिमकार्डवरून दुसऱ्या कंपनीच्या सिमकार्डवर फोन केल्यास प्रति मिनिटाला 6 पैसे द्यावे लागणार आहेत. याची भरपाई कंपनी तेवढ्याच पैशात फुकटात इंटरनेट डाटा देऊन करणार आहे, अशी माहिती जिओ कंपनीकडून देण्यात आली आहे.

फक्त जिओ फोन किंवा लँडलाईनवर जिओ सिमकार्डवरून फुकटात कॉलिंग सेवा देण्यात येणार आहे. तसेच व्हॉट्सअॅप, फेस टाईम आणि अन्य अॅपद्वारे केल्या जाणाऱ्या फोन कॉलवरही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच इन्कमिग सेवा पूर्वीप्रमाणेच मोफत असणार आहे, अशीही माहिती कंपनीने दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post