राहुरीमध्ये मोकाटे यांची माघार, कर्डिले- तनपुरे भिडणार


वेब टीम : अहमदनगर
विधानसभा निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्र माघारीच्या शेवटच्या दिवशी १२ पैकी ५ उमेदवारांनी अर्ज काढुन घेतल्याने ७ उमेदवार निवडणुक रिंगणात राहिले आहेत. राहुरी विधानसभा निवडणुकीचे खरे चिञ स्पष्ट झाले आहे.

सोमवार दाखल नामनिर्देशन पञ माघारी घेण्याचा दिवस असल्याने निवडणुक रिंगणात नेमके कोण राहणार याकडे अनेकांचे लक्ष वेधले होते.

दुपारी पावणे तीन वाजता राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे, गोविंद मोकाटे, नामदेव पवार, विजय तमनर, बाबासाहेब साठे यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले.

२१ ऑक्टोबरला होणा-या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार शिवाजी कर्डीले, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे, अपक्ष उमेदवार रावसाहेब राधुजी तनपुरे, चंद्रकांत संसारे, राजेंद्र कर्डीले, विनायक कोरडे, सुर्यभान लांबे हे ७ उमेदवार निवडणुक रिंगणात राहिले आहेत.

विधानसभा निवडणुक निरीक्षक म्हणुन सुरेशचंद्र दलाई, निवडणुक अधिकारी महेश पाटील व सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणुन फैसुद्यीन शेख काम पाहत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post